पनवेलमध्ये काँग्रेसचे भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो' आंदोलन....
‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो'आंदोलन....

पनवेल दि.१९ (वार्ताहर) : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संपूर्ण राज्यात भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून ‘जबाब दो मोदी सरकार जबाब दो' आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील काँग्रेसभवन येथे आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
                 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने व पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पनवेल शहर जिल्हा महिला प्रभारी नायडू मॅडम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव व पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी ऍड. हितेश थोरात, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित संचालक रामचंद्र पाटील, महिला पनवेल शहर जिल्हा अध्यक्षा निर्मला म्हात्रे, प्रवक्ते शशिकांत बांदोडकर, मल्लिनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव विश्वजित पाटील, जिल्हाध्यक्ष वैद्यकीय सेल डॉ. स्वप्नील पवार, नवीन पनवेल शहराध्यक्ष राहुल जानोरकर, अखिल अधिकारी, सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, कांती गांगर, आरती ठाकूर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी बोलताना पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले कि, भाजपचे वरिष्ठ नेते तथा जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये 40 जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले.  मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही, असे सांगितले. तर यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी नायडू मॅडम यांनी पुलवामा हल्ल्यातील ४० जवानांचे बलिदान हे भाजप व नरेंद्र मोदी यांनी फक्त लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी केले होते का? पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना न्याय मिळेल का असा सवाल केला. तर पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी बोलताना माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर मोदींना द्यावेच लागणार असल्याचे सांगितले.

फोटो : पनवेलमध्ये काँग्रेसचे भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image