पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा : खा.श्रीरंग बारणे..

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना..

पनवेल वैभव वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील 'ब्लॅक स्पॉट'च्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेतकठडे तुटले असेल ते दुरूस्त करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षमावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय पार पडली. बैठकीला खासदार सुनिल तटकरेआमदार महेंद्र दळवीअनिकेत तटकरेजिल्हाधिकारी योगेश म्हसेरायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडेपोलीस उपअधीक्षक  तानाजी चिखले,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील,जिल्हा वाहतूक समन्वयक सुवर्णा पत्कीसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुषमा गायकवाडएमएसआरडीएचे कार्यकारी अभियंता चेतन वाणीएनएचएचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर,  महेश देवकातेभरत शेडगे उपस्थित होते. केंद्र शासनाने सातत्याने अपघात होणारी ठिकाणेरस्त्याबाबतच्या समस्या याचा आढावा घेण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीचे गठन केले आहे. या समितीची दर सहा महिन्याला बैठक होते. रायगड जिल्ह्यातील या समितीचे अध्यक्ष खासदार बारणे आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. हकनाक लोकांचा बळी जात आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.  जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग करू नये याबाबत खबरदारी घ्यावी. दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचा कर्मचारी वाढवावा.  ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत.  त्या जागेवर तातडीने उपाययोजना कराव्यात. दिशा दर्शक बोर्ड लावावेत. ज्या ठिकाणचे कठडे तुटले असतीलते दुरूस्त करावेतअशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image