पनवेल वाहतूक शाखेचे वपोनि संजय नाळे, पोनि महेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महाअधिक्षक सन्मानचिन्ह प्रदान....
पोलीस महाअधिक्षक सन्मानचिन्ह प्रदान....

पनवेल, / दि.26 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रसंशनिय सेवेबद्दल महाराष्ट्रातील पोलीस सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 800 जणांना आज सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पनवेल वाहतूक शाखेचे वपोनि संजय नाळे यांच्यासह नेरुळ पोलीस ठाण्याचे पोनि महेश पाटील व तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस हवा. विजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे एकूण 800 जणांना आज पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी भागांचा समावेश आहे. तसेच नवी मुंबई परिमंडळ अंतर्गत परिमंडळ 1 व परिमंडळ 2 मधून वपोनि संजय नाळे, पो.नि. संजय चव्हाण, पो.नि.महेश पाटील, पो.नि.प्रकाश मोरे, पो.उपनिरीक्षक गणेश खांडेकर, पो.उपनिरीक्षक प्रदीप वाघ, पो.उपनिरीक्षक अविनाश तांबे, पो.हवा. जगदीश पाटील, पो.हवा. महेश वायकर, विजय पाटील, लक्ष्मण पवार, भानुदास मोटे आदी अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकार्‍यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो ः व.पो.नि.संजय नाळे, पो.नि.महेश पाटील, पो.हवा.विजय पाटील
Comments