खांदा वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन...
 विविध कार्यक्रमांचे आयोजन...

पनवेल / वार्ताहर :- १४ एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती खांदा वसाहत सेक्टर १३ मूलगंधकुटी बुद्धविहार सामाजिक ट्रस्ट भारतीय बोद्ध महासभा गट क्रमांक ७ व महिला आघाडी यांच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
सकाळी साडे नऊ वाजता धम्म ध्वजारोहण, सामुदायिक वंदना, धम्म प्रवचन ऍड दिलीप काकडे घटनानन्य स्नेह भोजन ठेवण्यात आले असून शालेय विद्यार्थी यांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर यांच्या प्रतिमेला हार घालून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून या भव्य जयंती सोहळ्यास मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक समाज सेवक संतोष इंगळे उपस्थित राहणार आहेत.
 सदर जयंती सोहळ्या करता मूलगंधकुटी बुद्ध विहार अध्यक्ष दिनेश जाधव कार्याध्यक्ष चंद्रसेन कांबळे सल्लागार जयंत भगत सचिव सुरेखा वाघमारे खजिनदार विश्वास भालेराव आणि कायकर्ते सोहळ्या करिता मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा जाधव या करणार आहेत .
या जयंती सोहळ्यात मोठया प्रामाणवर सर्व बहुजन बांधवानी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांन तर्फे करण्यात आले आहे .
Comments