लिफ्टचा बहाणा करून न्यायालयीन लिपिकाला लुटणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...
 पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...


पनवेल दि.२७ (वार्ताहर) : पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे.     
              पनवेल न्यायालयात कनिष्ठ लिपीक असलेले देवानंद प्रकाश खंडारे (३५) कर्जत येथे राहण्यास आहे. न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाला असताना ठाणा नाका येथे एका तरुणाने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याला पुढे सोडण्याची विनंती केली. त्यामुळे देवानंद याने सदर तरुणाला आपल्या मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर सदर तरुणाने देवानंद याला प्रथम करंजाडे येथे आणि त्यानंतर त्याला डोंबाळा कॉलेज लगतच्या महादेव मंदिराजवळ नेले. यांनतर तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याला मारहाण करून विवो कपंनीचे मोबाईल, टायटन कपंनीचे घड्याळ, साडे पाच हजार रोख रक्कम व मोटार सायकलची बॅटरी चोरी करून पळून गेले. या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा रवींद्र राऊत, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रवींद्र पारधी, पोशि प्रसाद घरत आदींचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढुन आरोपींचे येण्याचे ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपी आदित्य महाडीक (वय 20, रा. करंजाडे) आणि करण सिंग (वय 20, रा.करंजाडे) यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला विवो कपंनीचा मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले हेल्मेट जप्त केले आहे. 




फोटो : आरोपींसह पोलीस अधिकारी
Comments
Popular posts
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image