शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामोठे च्या वतीने "रोजगार मेळावा संपन्न " मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..
रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..


पनवेल दि . ३० ( वार्ताहर ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  कामोठे , महिला आघाडी  व श्रीमान योगी युवक प्रतिष्ठान  यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे से. २० येथे १ मे महाराष्ट्र दिन  व कामगार दिनानिमित्त "रोजगार मेळावा " आयोजित करण्यात आला होता.                                या कार्यक्रमाचे उदघाटन रायगड जिल्हा सपंर्क प्रमुख बबन दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील ,  पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम व महिला संघटिका कामोठे सौ. संगिता राऊत उपस्थित होते. यावेळी उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी  यांच्या नियोजनाखाली  उपशहर प्रमुख लकित रा. सोडेवाले,  उपशहर प्रमुख नागसेन मोरे ,सुनील पाध्ये,सुभाष काळे, अविनाश मोरे , मा. शाखा प्रमुखसंतोष सावंत,  दिगंबर पाटील , राकेश शिरावळे , सुनील जुवाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . तसेच सदर उपक्रमाचा एकूण  १४३ जणांनी लाभ घेतला .
Comments