पनवेल परिसरातील शाळेतील खेळाची मैदाने सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची मागणी...
खेळाची मैदाने खुली करण्याची मागणी...

पनवेल दि.१४ (वार्ताहर) : सिडको महामंडळाकडून शाळांना खेळाच्या मैदानासाठी देण्यात आलेले भूखंड शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेची मैदाने सामान्य नागरिकांना वापरण्यासाठी लवकरात लवकर खुली करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  
                    पनवेल तालुक्यात शेकडो शाळांना सिडको महामंडळाकडून खेळाच्या मैदानासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. सिडकोने मैदानांचे वाटप करताना संबंधित शाळांना नियम व अटींची पूर्तता करण्याचे आदेशही करारामार्फत दिले आहेत. त्या अनुषंगाने शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेची मैदाने सामान्य नागरिकांना वापरण्यासाठी खुली करणे बंधनकारक असताना शाळा प्रशासनाकडून शाळेची मैदाने व्यवसायाच्या हेतूने वापरली जात असल्याचा आरोप करत ती सामान्य नागरिकांसाठी लवकर खुली करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सिडकोकडे करण्यात आली आहे.
Comments