शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या सुपुत्रांचे बांधकाम व्यवसायामध्ये पदार्पण ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ...
 मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ...


पनवेल / दि.२२ (वार्ताहर) : शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या सुपुत्रांनी बांधकाम व्यवसायमध्ये पदार्पण केले असून आज अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर रेसिडेन्सी, कमर्शीयल हॉटेल व हॉस्टेल या तीन नवीन प्रोजेक्टचे शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांचे सुपुत्र दिनेश पाटील, गणेश पाटील व कैलास पाटील यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बांधकाम व्यवसायमध्ये पदार्पण केले आहे. आज त्यांच्या हर्षराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून तळोजा फेज १ आणि फेज २ येथे रेसिडेन्सी, कमर्शीयल हॉटेल व हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. या तीन नवीन प्रोजेक्टचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, मा. आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे नेते आर सी घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, काँग्रेस पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शेकाप तालुका चिटणीस नारायण घरत, नामदेव केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, भाजप नेते वासुदेव घरत, मा नगरसेवक अतुल पलन, प्रमोद पाटील, अनिल कदम, राजा केणी तसेच अनेक उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image