ओरियन मॉलमध्ये राबविण्यात आले मॉकड्रील...
ओरियन मॉलमध्ये राबविण्यात आले मॉकड्रील...

पनवेल / प्रतिनिधी -  : पनवेल शहरातील ओरियन मॉलमध्ये बुधवार 5 एप्रिल रोजी काही अतिरेकी शस्त्रासह घुसल्याची खबर कंट्रोल रूमला मिळताच त्या संदर्भातील फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना येण्यास सुरवात झाली व अवघ्या काही मिनिटीतच ओरियन मॉलला पोलिसांच्या पथकाने घेराव घातला व काही वेळातच मॉलची  तपासणी करण्यात आली. दहशतवादी विरोधात मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या मॉलमध्ये मॉकड्रिल करण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेकडून देण्यात आली. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
    
 बुधवारी सकाळी  साडे ९ च्या सुमारास नवी मुंबई पोलिस कंट्रोल रूममध्ये फोन खणखणला व त्याने ओरियन मॉलमध्ये अतिरेकी
घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार लगेचच पोलिस यंत्रण सतर्क झाली वघटनास्थळी पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाचारण करावे लागले व अवघ्य 15 ते 20  मिनीटात हि पथके घटनास्थळी पोहोचली. त्याचप्रमाणे क्यू.आर.टी.चे 2 अधिकरी आणि 28 कर्मचारी आणि प्रशिकक्षक बिलाल पटेल हे  पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचून त्यांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला. याचवेळी पनवेल अग्निशामक दलाचे
बंबसुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्यासह पनवेल शहर पोलिस ठाण्याचेवरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व विशेष पथकाने संपूर्ण मॉलची पाहणी केली. 

पथकाने संपूर्ण मॉल शस्त्रधारी जवानांसह पिंजून काढला असता एका गाळ्यामध्ये 2 अज्ञात इसम लपून बसल्याचे आढळून आल्याने त्यांना
त्यांनी खाली आणले यातील एकाला ठार मारण्यात आले तर एक अतिरेकी जखमी झाला आहे. अधिक चौकशीमध्ये अशा प्रकारची घटना
घडल्यानंतर शासकीय यंत्रणा किती वेळात पोहोचते हे पाहण्यासाठी त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांच्या अंतर्गत सध्या राबविण्यात येत
असलेल्या दहशतवादी विरोधात मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या मॉलमध्ये मॉकड्रिल  करण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेकडून देण्यात आल्या त्यानंतरच उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर पनवेलकरांनी अशा घटनांना घाबरून न जाता जसे आज सहकार्य केले तसेच सहकार्य पोलिस यंत्रणेला करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांनी यावेळी केले.
Comments