पनवेल मध्ये आगळ्या वेगळ्या ‘मैत्रेय प्राणिक हिलींग’ उपचार पद्धतीचे सेंटर सुरू...
पनवेल मध्ये आगळ्या वेगळ्या ‘मैत्रेय प्राणिक हिलींग’ उपचार पद्धतीचे सेंटर सुरू...

पनवेल दि.१७ (वार्ताहर) : पनवेल मध्ये एक आगळ्या वेगळ्या उपचार पद्धतीचे ‘प्राणिक हीलिंग’ सेंटर सुरु करण्यात आले आहे. सौ मेघना संजय कदम यांचे मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर उषा लक्ष्मी अपार्टमेंट, विरुपाक्ष मंदिरासमोर, जुना पोस्ट ऑफिसमार्ग येथे सुरू करण्यात आले आहे. या वेळी मुख्य ट्रेनर प्रीती कुलकर्णी, प्राणिक हिलर सई कुलकर्णी, प्राणिक हिलर विद्या पवार, प्राणिक हिलर प्रसाद हनुमंते आणि इतर उपस्थित होते.
               प्राणिक हिलींग ही फार जुनी आरोग्य उपचाराची अनोखी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचे औषध न घेता आजारावर उपचार करण्याची ही पद्धत आहे. या पद्धतीत प्राणिक हिलर आजारी व्यक्तीला कोणतेही मेडिसिन न देता आणि कसलाही स्पर्श न करता हिलींग द्वारे उपचार करतो. आजवर अनेक व्यक्तीनी याचा अनुभव घेतला आहे. त्यांचे आजार बरे झाले आहेत. विशेष म्हणजे आपणही स्वतः स्वतःला किंवा इतरांना हिलींग करू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला सदर कोर्स करणे महत्त्वाचे आहे. आता पनवेल मध्येही हिलींग सेंटर सुरू झाले आहे. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई याचे कोर्स चालू असून लवकरच या सेंटर वरही चालू होणार असल्याचे सौ मेघना कदम यांनी सांगितले. 

सदर कोर्स शिकण्यासाठी जे कोणी शिकण्यास इच्छुक असतील त्यांनी 7666327009 या नंबर वर संपर्क करावा. तसेच उपचारासाठी  8369765907 / 9930091516 / 9892715472 / 9867900552 यानंबर संपर्क करावा असे आवाहन मैत्रेय प्राणिक हिलिंगतर्फे करण्यात आले आहे.
फोटो : ‘मैत्रेय प्राणिक हिलींग’ उपचार पद्धत सेंटर सुरू
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image