भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके वाटून साजरी केली जयंती....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके वाटून साजरी केली जयंती....

पनवेल दि.१५ (वार्ताहर) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आदर्श आहेत. त्यामुळे त्यांची जयंती भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात साजरी केली जाते. प्रत्येक जण दरवर्षी आपापल्या पद्धतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे आपल्याला आढळून येते. 
           शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नीलिमा अरविंद मोरे व बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल येथे कार्यरत असलेले अरविंद मोरे या दाम्पत्यांनी एक वेगळी संकल्पना घेऊन भीम जयंती साजरी केली. ह्या दाम्पत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे " माझी आत्मकथा " हे पुस्तक भीम नगर, पनवेल ह्या वस्तीत वाटप करून भीम जयंती साजरी केली.  ह्याप्रसंगी मोरे दाम्पत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे पुस्तक प्रेमी होते व त्यांनी पुस्तकासाठी राजगृह बांधणारे ते एकमेव महामानव असल्याचे सांगितले. ते अहोरात्र पुस्तकाचे अध्ययन करीत असत. डॉ बाबासाहेब  आंबेडकर हे  पुस्तक वाचूनच घडले. माझी आत्मकथा हे पुस्तक त्यांचे  संपूर्ण आत्मचरित्र आहे. मोरे दाम्पत्य म्हणाले की, हे पुस्तक वाचून नक्कीच लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी आहे. जर आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन जास्तीत जास्त पुस्तकांचे अध्ययन केले तर आपण खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ठरणार आहोत व एक सुसंस्कृत नागरिक घडणार आहोत. भीमनगर, पनवेल येथील उपस्थित नागरिकांनी  मोरे दाम्पत्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम बघून आनंदित झाले व त्यांनी ह्या उपक्रमाचे स्वागत करून आनंद व्यक्त करून मोरे दाम्पत्याचे आभार मानले.




फोटो : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाटून साजरी केली जयंती
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image