खासदार उदयनराजे भोसले यांची नवीन पनवेल येथे सदिच्छा भेट...
खासदार उदयनराजे भोसले यांची नवीन पनवेल येथे सदिच्छा भेट...

नवीन पनवेल / वर्ताहर  : खासदार उदयनराजे भोसले 8 एप्रिल रोजी सायंकाळी नवीन पनवेल मध्ये आले होते.
     केंद्र सरकारच्या  सुक्ष्म , लघु व मध्यम अंतर्गत मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी व त्या संदर्भात चर्चा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तसेच नवीन पनवेलच्या विविध नागरी समस्यांबाबत माहिती घेवून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे सहायक सचिव संदीप पोखरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीवेळी दिले. 
यावेळी सुरेश शेळके कार्यकारी संचालक सिडको, चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक अशोक शेळके , माजी नगरध्यक्ष सुनील घरत, वैभव शेळके, मयूर शेळके, कमलेश पाटील, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Comments