शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटकपदी कुणाल कुरघोडे यांची नियुक्ती..
कक्ष तालुका संघटकपदी कुणाल कुरघोडे.. 
पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटकपदी कुणाल कुरघोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी कुणाल कुरघोडे यांच्याकडे युवासेना पनवेल शहर अधिकारी तसेच पनवेल शहर ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख या पदांची जबाबदारी असताना त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर,अशी अनेक समाजोपयोगी कामे पक्षाच्या माध्यमातून केली आहेत. याचीच दखल घेत त्यांची नियुक्ती तालुका ग्राहक संरक्षण कक्ष संघटकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

भविष्यात देखील तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कक्षाच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments