बी आर एस (BRS) कार्यकर्त्यांनी निवडणूकींची तयारी सुरू करावी ; प्रा.विजय मोहिते...
बी आर एस (BRS) कार्यकर्त्यांनी निवडणूकींची तयारी सुरू करावी ; प्रा.विजय मोहिते...


पनवेल वैभव वृत्तसेवा : -    BRS ची महाराष्ट्रात पक्ष बांधणी जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून BRS अध्यक्ष व तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यानी सहा विभागांसाठी 6 समन्वयक नेमले आहेत. कोकण अथवा मुंबई विभाग साठी प्रा विजय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मुंबई प्रांतातील विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधींची सभा देवराज हॉल दादर मुंबई येथे आयोजित केली होती. महाराष्ट्रातील राजकारणात BRS चे आगमन झाल्यापासून खळबळ निर्माण झालेली आहे. अनेक पक्षातील प्रस्थापित नेते पक्ष प्रवेशासाठी के चंद्रशेखर राव यांच्याकडे भेटीसाठी प्रयत्न करत आहेत.

तेलंगणाचे विकास मॉडेल, शेतकरी आत्महत्येच्या संख्येत झालेली लक्षणीय घट या BRS पक्षाच्या जमेच्या बाजू आहेत. शहरीकरण आणि पायाभूत सुविधा यामध्ये सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत तेलंगणा ने आघाडी घेतलेली आहे. नुकतेच फॉक्सकॉंन सारख्या कंपनीने एक लाख प्रत्यक्ष रोजगार देणारा प्लांट तेलंगणा मध्ये सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हायटेक सिटी च्या माध्यमातुन देशातील सर्वाधिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार तेलंगणा राज्य देत असल्याचे दिसून येते.
या सर्व बाबी पक्षाच्या विधानसभा मतदारसंघ प्रतिनिधींनी लोकांमधे जाऊन सांगाव्यात. तेलंगणा विकासाचे मॉडेल म्हणुन उजेडात आणावे यासाठी आजही मीटिंग बोलावण्यात आली आहे. लोकांसमोर BRS हा चांगला राजकीय पक्ष म्हणुन सर्वात पहिला पर्याय असला पाहिजे असेही प्रा विजय मोहिते यानी सांगितले. जमलेल्या प्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात पक्षाची मजबूत बांधणी करून येणार्‍या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार रहायचे असल्याचे ते पुढे म्हणाले.

बीआरएस चे एमएलसी व मुख्यमंत्रांचे मुलगी K कविता यांही दिल्ली चे जंतर मंतर येथे आज निषेधार्थ महिला करीता आरक्षण मिळावे याकरिता उपोषण केले, म्हणून संसदेत बिल पारित करण्याची मांगणी केली आहे या सभेत  आंदोलनसाठी पाठिंबा देण्यात आला. बीआरएस चे मुंबई प्रांताध्यक्ष हेमंतकुमार यांनी केंद्र सरकार ला इशारा दिला आहे की कविता यांना ई डी मार्फत त्रास दिला तर मुंबई मध्ये त्रिवपने आंदोलन करणार असल्याचे सांगितले, 
सदर सभेत जनरल सेक्रेटरी बोले शिवराज  व इतर प्रतिनिधि उपस्थित होते.
 


कोट

भीष्म कर्ण अन पांडव सारे, एक होऊया चला र...आपल्याच कवितेच्या या ओळी उद्यृक्त करून ज्ञानेश वाकुडकर यानी इतर पक्षात असणार्‍या चांगल्या व्यक्तिंना साद घातली व के चंद्रशेखर राव यांच्या सोबत भारत राष्ट्र समिति मध्ये काम करण्यासाठी आवाहन केले.
ज्ञानेश वाकुडकर ..

 के चंद्रशेखर राव  यांच्या रूपाने अद्वितीय नेतृत्व लाभलेले असून आम आदमी पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष पद सोडून मी त्यांच्याकडे आलेलो आहे.
हरिभाऊ राठोड
माजी खासदार ..


Comments