खांदेश्वर स्टेशन परिसरात नागरिकांना अंधारातून काढावा लागतो मार्ग...
खांदेश्वर स्टेशन परिसरात नागरिकांना अंधारातून काढावा लागतो मार्ग...


पनवेल / दि.३१ (वार्ताहर) : खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरातील पथदिवे बंद असल्याने रात्री नागरिकांना काळोखातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री उशिराने येणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने येथील पथदिवे सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  
   कामोठे सह खांदा कॉलनी परिसरात राहणारे नागरिक रात्री लोकलने कामावरून येताना खान्देश्वर स्थानकात उतरतात. मात्र परिसरातील पथदिवे बंद असल्याने रात्री घर गाठताना नागरिकांना काळोखातून मार्ग काढावा लागत आहे. अपरात्री रेल्वेस्थानक परिसरात अंधार असल्याने चालत घर गाठणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर येथील पथदिवे सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments