वेश्वी येथील स्वयंभू श्री एकविरा देवी मंदिराचे नूतनीकरण व उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा...
उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा...

पनवेल / प्रतिनिधी :

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी येथील डोंगरावर जागृत एकविरा देवीचे मंदिरात  देवीच्या पाऊलखुणा असल्यामुळे १९९६ मध्ये २८ तरुण एकत्र येऊन ग्रामस्थांनच्या मदतीने मंदिराची स्थापना केली. 
त्या नंतर १९९७ सालापासून दरवर्षी येथे देवीचा पालखी सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे जागृत स्थान असलेल्या श्री एकविरा देवीची चैत्र यात्रा मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३ ते बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ या कालावधीत मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनकडून संपन्न होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून स्वयंभू श्री एकविरा देवी मंदिराचे नूतनीकरण व उद्घाटन सोहळा सकाळी ७ च्या सुमारास ग्रामस्थ तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
सकाळी देवीचे पूजन करून त्यानंतर काकड आरती करण्यात आली. आरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली होती.श्री एकविरा देवीच्या पालखीची भव्य मिरवणुक  वेश्वी गावातील देवीचे माहेर घर असलेल्या मंदिरापासून होते आणि ती वेश्वी गडावरील देवीच्या मंदिरात ग्रामस्थांनकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. 
या मंदिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती राजेश जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच या मंदिर उद्घाटन व काकड आरतीसाठी वेश्वी ग्रामपंचायत सरपंच श्री संदिप गणपत कातकरी, उपसरपंच सौ नुतन प्रितम मुंबईकर, ग्रामसेविका सौ रेश्मा ठाकूर, सदस्य श्री अजित पाटील,श्री. संदीप पाटील, श्री सुनिल तांबोली, सदस्या सौ ज्योत्स्ना पाटील, सौ प्रमिला महेंद्र मुंबईकर, सौ निकिता आकाश खैरे, माजी सरपंच श्री नरेंद्र शंकर मुंबईकर, उद्योगपती श्री विद्याधर नारायण मुंबईकर, रायगड भूषण, कॉन अध्यक्ष श्री राजु मुंबईकर, श्री. एकनाथ अनंत पाटील,श्री. गजानन मुंबईकर, श्री दिगंबर कडू,श्री वैजनाथ मुंबईकर,श्री चंद्रकात मुंबईकर, एकविरा मंडळ अध्यक्ष श्री.रविंद्र रामदास पाटील, उपाध्यक्ष श्री अभिमन्यू मुंबईकर, खजिनदार श्री. प्रविण मुंबईकर, सहखजिनदार श्री दत्ता कडू,चिटणीस श्री. महेंद्र नारायण मुबईकर, सहचिटणीस श्री जगदीश रामा पाटील,तसेच सभासद श्री मदन पाटील,श्री कलावंत पाटील, श्री पवित्र पाटील, श्री विलास मुंबईकर,श्री रुपेश मुंबईकर, श्री अमित मुंबईकर, श्री पांडुरंग मुंबईकर, श्री अरुण मुंबईकर, श्री सुरेंद्र मुंबईकर तसेच सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मंदिराचे सुंदर नूतनीकरण पनवेल येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट आरकृती इंटेरियर डिझाईनर श्री राहुल लहू कदम यांनी केले, तसेच श्री एकविरा मातेची मंदिरासमोर सुंदर रांगोळी रतीका रविन्द्र पाटील यांनी काढली. दरवर्षी प्रमाणे वेश्वी येथील उत्कर्ष डेकोरेटर साऊंड सर्विस यांनी साऊंडची सेवा दिली. तसेच अनेक ग्रामस्थांनी कोणत्या ना कोणत्या रुपात उत्सव साजरा करण्यास  हातभार लावला.उपस्थित मान्यवरांचे श्री एकविरा देवी मंडळ वेश्वी तसेच ग्रामस्थांनकडून यथोचित मानसन्मान करण्यात आले. 
या उत्सवा दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण निधीतून ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी मार्फत भाविकांना सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन पार पडले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन पाटील यांनी केले.
Comments