कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदिर परिसरात स्ट्रीट लाईट लावण्याची शिवसेनेची मागणी...
स्ट्रीट लाईट लावण्याची शिवसेनेची मागणी...
पनवेल / दि.२४ (संजय कदम) : पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदीर येथे स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख ऍड आशिष पनवेलकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
           यासंदर्भात  ऍड आशिष पनवेलकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,  कुंभारवाडा पनवेल परिसरातील आमचे समाजाचे संत गोरा कुंभार यांचे मंदीर आहे. सदर मंदीर परिसरातील संध्याकाळच्या वेळी परिसरातील सर्व लोक दर्शनासाठी तेथे येत असतात परंतु मंदीर परिसरात काळोख असतो. कृपया आपण सदरच्या विषयामध्ये लक्ष घालुन मंदीर परिसरात स्ट्रीट लाईट लावण्याची सोय उपलब्ध करून दयावी अशी मागणी केली आहे.
फोटो : ऍड आशिष पनवेलकर व निवेदन
Comments