लोकल मध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट....
लोकल मध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट.... 


पनवेल दि. २३ (वार्ताहर) : हार्बर लोकल रेल्वे मार्गावर चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ठाणे-पनवेल रेल्वे मार्गामध्ये दोन वेगवेगळ्या मोबाईल चोरीची घटना घडली आहे. 
           घणसोली येथे राहणारा संदीप पालवे ठाणे-पनवेल लोकलने जुईनगर येथे जात असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १४ हजार रूपये किमतीचा मोबाइल चोरून नेला आहे. त्याचप्रमाणे ऐरोलीमधील सोमनाथ पाटील या युवकाचा मोबाइल ऐरोली ते बेलापूर दरम्यान चोरीला गेला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे वाशी व पनवेल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दररोज अश्याप्रकारे मोबाईल चोरीची घटना घडत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांविरोधात तातडीने पावले उचलावीत अशी मागणी रेल्वे प्रवाशी करत आहेत.
Comments