दोन मुलांसह महिला बेपत्ता...
दोन मुलांसह महिला बेपत्ता...

पनवेल दि.३१ (वार्ताहर) : तालुक्यातील पारगाव येथून आपल्या दोन मुलांना सोबत घेवुन कोणास काही एक न सांगता राहते घरातुन महिला कोठेतरी निघुन गेल्याने महिलेसह मुलांच्या हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
                   कल्पना रामगिरी गिरी असे या महिलेचे नाव असून ती आपल्या तुषार गिरी आणि चेतन गिरी या दोन मुलांसह कोठेतरी निघून गेली आहे. कल्पनाचे वय २५ वर्षे असून अंग मध्यम, रंग-गोरा, नाक सरळ, केस काळे, डोळयावरती चष्मा, गळयात सोन्याचे मनी मंगळसुत्र तर अंगात निळया रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तर मोठा मुलगा तुषारचे वय ६ वर्षे असून त्याचा रंग गोरा, नाक सरळ असून अंगात निळया रंगाची जिन्स पॅन्ट व काळया रंगाचा शर्ट घातलेला आहे त्याचप्रमाणे लहान मुलगा चेतन चे वय ३ वर्षे असून तो रंगाने गोरा, नाक सरळ असून त्याने निळया रंगा ची जिन्स पॅन्ट व लाल रंगाचा टि शर्ट घातलेला आहे. या महिलेसह मुलांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.



फोटो : बेपत्ता मुलांसह महिला
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image