मारहाण करून चालकाची केली लूट..
मारहाण करून चालकाची केली लूट.. 


पनवेल दि. ११ (वार्ताहर) : लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकाला तीन अज्ञात इसमांनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व १० हजार रुपये रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे. 
रामचंद्र मोटे हे त्याच्याकडील टेम्पो घेऊन पुणे येथे जात असताना त्यांनी कळंबोली येथे टेम्पो बाजूला लावून ते  लघुशंकेसाठी उतरले असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व १० हजार रुपये रोख रक्कम घेऊन पलायन केले. या घटनेमुळे घाबरलेला मोटे याची प्रकृती बिघडली. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Comments