महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार...
महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार... 


पनवेल / दि.२९ (संजय कदम) : पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिला व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली.
पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या सौ. सुप्रिया गणेश पाटील (वय ३०,रा.कोप्रोली, उरण) ह्या त्यांचा मावस भाऊ सर्वेश म्हात्रे सोबत त्यांच्या मित्राची निळया रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार (एमएच ४६ बीके ०६९८) ने पनवेल उरण जुन्या मार्गाने जात असताना बंबावीपाडा येथे एका अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन त्याचेकडील कोणत्यातरी अग्नीशस्त्राने सुप्रिया यांच्यावर गोळीबार करून पळुन गेला आहे. यामध्ये सुप्रिया यांच्या डावे पायाचे गुडघ्याखाली गोळी लागून जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अपोलो रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेची माहिती घेतली. सदर गोळीबार व्यावसायीक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान नुकतेच नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिक सावजी पटेल यांच्यावर सुद्धा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबाराची घटना घडल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
फोटो : घटनास्थानी पाहणी करताना पोलीस अधिकारी
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image