रेल्वे स्टेशन बाहेरून दुचाकीची चोरी ...
रेल्वे स्टेशन बाहेरून दुचाकीची चोरी  ...


पनवेल दि. ११ (वार्ताहर) : खान्देश्वर रेल्वे स्टेशन बाहेर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  
करंजाडे येथे राहणारा तरुण राजेंद्र परिहार याचे मोबाइलचे दुकान आहे. तो वडाळा येथे जाण्यासाठी त्याच्याकडील दुचाकी त्याने खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभी केली होती. मात्र परत आल्यानंतर त्याला त्याची दुचाकी पुन्हा त्याचठिकाणी सापडली नाही. त्यामुळे त्याने गाडी चोरीची तक्रार खान्देश्वर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
Comments