कामोठ्यात रंगणार ‘आमदार केसरी’ च्या माध्यमातून कुस्त्यांची दंगल ...
कुस्त्यांचे जंगी सामने 'आमदार केसरी २०२३'

पनवेल / दि.१४ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान कुस्ती संघ, कामोठे च्या माध्यमातुन कामोठे मध्ये रविवार १९ मार्च रोजी ‘आमदार केसरी २०२३’ चा थरार रंगणार आहे. या कुस्तीमधील विजेत्या पैलवानाला १ लाख २१ हजारांचे पहिले इनाम मिळणार आहे.
कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थापित केलेल्या जय हनुमान कुस्ती संघाच्या माध्यमातून कामोठे पोलीस स्टेशन समोरिल मैदानात हि कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास घरत आणि भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कुस्त्यांचे सामने आयोजित केले असून या वेळी पै.वैभव माने व पं. सुबोध पाटील तसेच पै. नवीन कुमार व पै. तानाजी विरकर या नामवंत मल्लांमध्ये लढती होणार आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन रविवार १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या पैलवानाला पहिले इनाम १ लाख २१ हजार चे बक्षीस मिळणार आहे. तसेच दुसरे इनाम १ लाख ११ हजार, तिसरे इनाम ८० हजार, चौथे व पाचवे इनाम प्रत्येकी ६० हजार व ४० हजार इतके आहे. या स्पर्धेला मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 



फोटो : बॅनर
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image