पनवेल परिसरात दोन वेगवगेळ्या ठिकाणी वाहने कलंडली ; जीवित हानी नाही...
पनवेल परिसरात दोन वेगवगेळ्या ठिकाणी वाहने कलंडली ; जीवित हानी नाही...

पनवेल / दि.२१ (संजय कदम):  पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने कलंडल्याची घटना घडली असून यात वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही झाली.
     यातील पहिल्या अपघातात पनवेल तालुक्यातील बोनशेत येथे गाडी मागे घेत असताना ती कलंडल्याने अपघात झाला. एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ताब्यातील सेंट्रो कार घेऊन पनवेलच्या दिशेने जात होते. यावेळी ते चिपळे बोनशेत स्टॉप वर दोन हजार रुपये सुट्टे घेण्यासाठी खाली उतरले. मात्र टपरी चालकाकडे सुट्टे नसल्याने ते पुन्हा येऊन गाडीत बसले व त्यांनी गाडी चालू केली आणि मागे घेत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी बोनशेत स्टॉप वरील नाल्याजवळ कलंडली.  ते त्वरित खाली उतरल्याने मोठा अपघात टाळला. यात गाडीचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत पनवेल जवळील लोहोप वरून पनवेल कडे प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस ठोंबरेवाडी जवळ आज सकाळच्या सुमारास कलंडली. सदर हा अपघात बस मधील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे बस चालकाचे म्हणणे आहे. बस चालवीत असताना बस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज चालकास आल्याने त्याने बसचा वेग कमी केला होता मात्र पहाटेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे रस्ता चिकट झाला असल्याने बस पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती त्यामुळे बस रस्त्यावरून बाजूला सरकून रस्त्या लगत असलेल्या खड्ड्यात गेली व तेथे कलंडल्याने झालेल्या अपघातात बस मधील कोणत्याही प्रवाश्याला कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी अत्यावश्यक मार्गिकेतुन बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना परिसरातील नागिरकांनी मदतीचा हात देत सुखरुपणे बाहेर काढले. साधारणपणे ५० हुन अधिक प्रवाशी बस मधून प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

फोटो: अपघातग्रस्त वाहने
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image