रोटरी तर्फे मोफत आरोग्य तापासणी व औषधांचे वाटप...
पनवेल / वार्ताहर - :
रोग प्रतिबंध आणि उपचार हे रोटरी चे एक प्रमुख अंगांपैकी एक अंग आहे .हेच डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ने रविवार , दि. 26 फेब्रुवारी रोजी अमोल ऑटोमोबाईल ,शेडुंग येथे एक उपक्रम राबविला .
या उपक्रमात पेट्रोलपम्प वरील कामगार आणि आजूबाजूलच्या गावातील नागरिकांची मोफत आरोग्यतापासणी आणि मोफत आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले .त्याचबरोबर शंकरा आय हॉस्पिटल च्या वतीने मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली .
सदर उपक्रमात बीएमाय ,हिमोग्लोबिन , ब्लड प्रेशर , ऑक्सिजन पातळी , हाडांची घनता , फुफुसांची क्षमता , नूरोपथि , ईसीजी , सामान्य तपासणी , डोळ्यांची तपासणी आशा विविध तपासण्या करण्यात आल्या.
या उपक्रमात क्लबचे मार्गदर्शक आणि पनवेल मधील नामवंत सर्जन डॉ. गिरीश गुणे, डॉ. संजिवनी गुणे , डॉ . लक्ष्मण आवटे , डॉ . राजेश गांधी , डॉ . अमोद दिवेकर , डॉ .अभय गुरसळे , डॉ जया गुरसळे , डॉ सुधा भगत , डॉ . मिलिंद घरत , डॉ रोहिणी घरत डॉ . तुषार जोशी या पनवेल मधील नामवंत डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली .
या वेळी परिसरातील नागरिकांनी हा समाजोपयोगी उपक्रम राबविला त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे आभार मानले .