छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र तरुण पिढीला आदर्शवत - प्रा.नितीन बानुगडे पाटील..
शिवजन्मोत्सव निमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

पनवेल दि.२० (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. स्वराज्य स्थापन करताना महाराजांना मिळालेले मावळे हे स्वराज्यासाठी ध्येयवेडे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.   
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानंच आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलोनी सेक्टर ९ येथील बुधवार बाजार मैदान येथे आयोजित या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने खांदा वसाहतीतील नागरिक उपस्थित होते. 
फोटो : परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे शिवव्याख्यान
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image