मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हाॅस्पिटल व शिल्पा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न...
 संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न...

पनवेल दि.०९(वार्ताहर): कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हाॅस्पिटल व शिल्पा मेडिकल 
यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय,कळंबोली या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.याशिबिराचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले.
         साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवहानाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी हार,तुरे व बॅनबाजीला फाटा देत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. या निमित्त आरोग्य शिबीरा मध्ये सामान्य शारिरिक सपासणी,बालरोग स्त्रीरोग तपासणी,मधुमेह रूग्णांना विशेष मार्गदर्शन तसेच सी.बी.सी, शुगर, बी.पी, वजन,ऊंची,बीएमआय. 
इत्यादी तपासण्या करण्थात आल्या व मोफत औषधे देण्यात आली. या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली,  अत्यंत कमी वेळात अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला या बद्दल रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे आणि सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. मोफत आरोग्य तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणे विषयी सुंदर काम कोणतेही नसून या अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. असे प्रतिपादन केले या वेळी प्रतिष्ठान चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या आरोग्य शिबिरात शेकडो लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली.या आरोग्य शिबिरासाठी सिद्धीविनायक हाॅस्पिटलचे डाॅ.संजय कदम, डाॅ. पल्लवी कदम व शिल्पा मेडिकल चे विवेक शिंदे यांचे सहकार्य मिळाले, सदर चे शिबीर यशस्वी करण्यासाठी ऑड.श्रीनिवास क्षीरसागर, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके बाळासाहेबांची शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, निलेश दिसले, संजय शेडगे, महेश गोडसे, संभाजी चव्हाण, आबा लकडे, नाना मोरे, सागर मोरे, नारायण फडतरे, नितिन गुलदगड, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा कैवारी आणि सर्वसामान्य जनतेची नस उमगलेला नेता अशी ख्याती झालेली आहे - आमदार प्रशांत ठाकूर  

आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, त्यांचा वाढदिवस हार, तुरे, सत्काराला फाटा देत साधेपणाने समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या अनुषंगाने परिसरातील गरिब व गरजू रूग्णांना या आरोग्य शिबिराचा लाभ झाला हे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे फलित आहे.
रामदास शेवाळे 
जिल्हासंपर्कप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना.

फोटो: मोफत आरोग्य तपासणी शिबीर
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image