व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट,अवयव दान करुन प्रिय व्यक्तींचे वाचविले प्राण....
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पीटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण प्रकरणांची नोंद....
पनवेल वैभव वृत्तसेवा  :  - जगभरातील सर्वच नाती ही प्रेमाने जोडली गेली आहेत, प्रेम नसेल तर नाती टिकूच शकत नाही. प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. या दिवशी प्रत्येजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. खारघर येथील मेडीकव्हर रूग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रेमदिनी ही एक अनोखी बाब असून आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रियजनांकडून अवयव दान करण्याचे उचललेले धाडसी पाऊल आहे. दात्यांनी घेतलेल्या अतिशय धाडसी कृतीने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्मांण केला आहे. या दात्यांचे सर्वच स्तरांतून कौतूक केले जात असून त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाला व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सलाम.

रवींद्रनाथ शेंदरे या 38 वर्षांच्या रूग्णाला हिपॅटायटीस-बी या आजाराचे निदान झाले, वैद्यकीय उपचारानंतरही नोव्हेंबर महिन्यात त्यांचे यकृत निकामी झाले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासणी आणि उपचार करूनही प्रकृतीत कोणतीच सुधारणा नसल्याने यावर प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग होता. अशा परिस्थितीत पत्नी दीपाली शेंदरे यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला आणि मग यशस्वी प्रत्यारोपण झाले. आता दाता आणि प्राप्तकर्ता दोघेही बरे झाले असून सर्वसामान्य जीवनशैली जगत आहेत. आपल्या पतीसाठी पुढे सरसावत हा धाडसी निर्णय घेऊन एक नवसंजीवनी आपल्या पतीला दिपालीने दिली हे एक निस्वार्थ प्रेमाच प्रतिक आहे हेच या उदाहरणातून दिसून येते. 

बड चियारी सिंड्रोमचे निदान झालेल्या औरंगाबाद येथील 38 वर्षीय महेंद्र बोरडे-पाटील यांना ५ वर्षापासून ग्रासले होते. त्यांच्यावर विविध उपचार सुरू होते, वेनोप्लास्टी करण्यात आली होती.  मात्र रात्रीतून त्यांची प्रकृती बिघडली आणि शेवटी यकृत प्रत्यारोपण हा एकच मार्ग समोर होता. पण, त्यांचा रक्तगट बी होता आणि त्यांच्या कुटुंबात कोणताही रक्तगट जुळणारा रक्तदाता नव्हता. त्यांची पत्नी रूपाली ही यकृत दान करण्यास इच्छुक होती परंतु तिचा रक्तगट ए होता. हे आव्हान स्विकारत मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले असून आता तो रुग्ण आणि दाता दोघेही पूर्णतः बरे आहेत. 

दिगंबर देशपांडे, नांदेड येथील ३७ वर्षीय रूग्ण असून त्यांना ऑटोइम्यून यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. त्याचे यकृताचे कार्य बिघडत होते आणि लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. त्यांच्या ४७ वर्षाय बहीणीने यकृत दानाचा निर्णय घेत यकृताचा डावा भाग दान केला. आता रूग्ण उत्तम आहे. 


अंतिम टप्प्यातील यकृत आजाराचे निदान झालेल्या व्यक्तींना तातडीने प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. अवयवदान मोहिमेला चालना देणे आणि गरजूंना नवीन जीवन देणे ही काळाची गरज आहे. अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्य असल्याचे डॉ. विक्रम राऊत, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि एचपीबी सर्जरीचे संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांनी स्पष्ट केले. अवयव दानामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिक असून बऱ्याच प्रकरणांमधील दात्यांमध्ये महिलांचा समावेश दिसून येतो असेही डॅा राऊत यांनी स्पष्ट  केले. वरील सर्वच प्रकरणातून खऱ्या प्रेमाची प्रचिती आली असून आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून अवयव दान करणे हे केवळ त्या व्यक्तीवरील असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य होऊ शकते असेही डॅा राऊत यांनी स्पष्ट केले.

वरील सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या आव्हानात्मक होत्या. पंरूतू, मेडीकव्हर रूग्णालय येथे असलेल्या सर्व सुविधा आणि परिपूर्ण टीममुळे रूग्णास उत्तमोत्तम आरोग्य सेवा आणि उपचार देणे शक्य असल्याचेही डाँ.राऊत यांनी सांगितले.

खारघरचे मेडिकव्हर हॉस्पीटल रुग्णांना चोवीस तास उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी आणि यशस्वी उपचाराकरिता ओळखले जाते. आम्ही प्रत्येक रुग्णाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो. आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी कार्यरत असलेला यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग सर्वच यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरेल अशी प्रतिक्रिया डॉ नवीन के एन, केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी व्यक्त केली.

या शस्त्रक्रियेत डाँ.हार्दिक पहारी, डाँ.अमृता राज, डाँ.अमेय सोनावणे आणि डाँ.अमरीन सांवत आणि डाँ.जयश्री व्ही यांचा सहभाग होता.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image