पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने केले लंपास....
पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने केले लंपास....
  

पनवेल दि १२(संजय कदम) :  पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत जवळपास दीड लाख रुपये इतकी आहे ते लबाडीने एस. टी चढत असताना अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना पनवेल एसटी आगारात घडली आहे. 
            मुंबई येथे राहणाऱ्या अक्षता मेहतर (वय २४) या त्यांच्या आई बरोबर अलिबाग येथे जाण्यासाठी पनवेल एसटी आगारातील एसटी मध्ये चढत असताना त्यांनी पाठीवर घेतलेल्या  बॅगेमधून अज्ञात चोरट्याने लबाडीने  पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत जवळपास दीड लाख रुपये इतकी आहे ते काढून घेऊन  तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments