एक लाख दहा हजारांची फसवणूक ...
एक लाख दहा हजारांची फसवणूक ...

 पनवेल / वर्ताहर - : सोन्याचे दागिने गोठवून त्यामध्ये भर घालून नवीन दागिने बनवण्यासाठी दिले असता ते बनवून न देता फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये  उघडकीस आला आहे. या प्रकरणी रमेश जाठ, बालाजी ज्वेलर्स मिरची गल्ली, पनवेल याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
अशोक बाग झोपडपट्टी, पनवेल येथील स्मिता गजानन पवार या बालाजी ज्वेलर्सचे मालक रमेश जाठ यांच्याकडे लहान सहान सोन्याचे अलंकार बनवत होते. 2019 मध्ये त्यांनी जुने सोने मोडून नवीन सोन्याचे दागिने बनवण्यास दिले, मात्र ते दागिने परत न करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने फोन सुद्धा उचलले नाहीत. व स्मिता पवार यांची फसवणूक केली. एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रमेश जाठ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Comments