रोटेरीयन डॉ.अनिल परमार यांचा ब्रह्मकुमारी राजयोगिनी तारा दीदी यांच्या हस्ते विशेष सत्कार...
तारा दीदी यांच्या हस्ते विशेष सत्कार...

पनवेल / वार्ताहर - : रोटेरीयन डॉ.अनिल परमार, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा ब्रह्मा कुमारी राजयोगिनी तारा दीदी ब्रह्मा कुमारीज पनवेल सेवाकेंद्र प्रभारी यांनी मानवतेच्या सेवेसाठी दिलेल्या अथक वचनबद्धतेबद्दल आणि निस्वार्थ योगदानाबद्दल, 19 फेब्रुवारी रोजी डिवाईन होलिस्टिक हेल्थ सेंटर, नील हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला. 
यावेळी बीके डॉ शुभदा नील, बीके कमल, रोटेरीयन लक्ष्मण पाटील अध्यक्ष रोटरी क्लब पनवेल सेंट्रल, रोटेरीयन डॉ स्वाती लिखिते अध्यक्ष  रोटरी क्लब एलिट, रोटेरीयन एजी अविनाश कोळी, रोटेरीयन  प्रदीप डावकर अध्यक्ष रोटरी क्लब नवीन पनवेल, विजय भावसार अध्यक्ष, अरविंद बोधनकर संस्थापक अध्यक्ष, महावीर इंटरनॅशनलचे सपन बर्धन, मंगला गडमुले व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments