अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्या अरुणा दडस यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कळंबोली शहर अध्यक्षपदी निवड...
कळंबोली शहर अध्यक्षपदी निवड...

पनवेल / दि. ११ (वार्ताहर) : कळंबोली येथील अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्या अरुणा दडस यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कळंबोली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी प्रवीण काकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे, संघटनमंत्री दयानंद ताटे, आण्णासाहेब वावरे, इंद्रजीत ताटे, गडदे, सौ. अरुणा वावरे, कल्पना दडस, सविता गव्हाणे, वनिता दडस, अरुण दडस उपस्थित होते. माइयावर समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असून समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे अरुणा दडस यांनी निवड झाल्यानंतर सांगितले.
फोटो : अरुणा दडस यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कळंबोली शहर अध्यक्षपदी निवड
Comments