कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सी.डब्ल्यू.सी.द्रोणागिरी नोड सुरू होणार....
सी.डब्ल्यू.सी.द्रोणागिरी नोड सुरू होणार....
उरण / प्रतिनिधी - : दिवंगत लोकनेते दि. बा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८४ च्या  शौर्यशाली व गौरवशाली लढ्यात पंच हुतात्मे  व अनेकजण गोळीबारात जखमी झाले होते. त्यांचे वारस तसेच पागोटे,पाणजे व महालन परिसरातील ३५० प्रकल्पग्रस्त कामगारांना १९८७-८८ साली रोजगार देण्यात आला होता. परंतु सी.डब्ल्यू.सी. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे स्थानिक कामगार व कंपनीवर अवलंबून असणाऱ्या हजारो प्रकल्पग्रस्त,  ट्रक मालक,टेम्पो ओनर्स, चहा टपरी यांचा रोजगार बुडाला होता.दरम्यान अनेक कंत्राटदार येऊन गेले परंतु ते अयशस्वी झाले.त्यामुळे २०१५ पासुन ते आजतागायत कामगार बेरोजगार राहिले.सी.डब्ल्यू.सी. कंपनीच्या दिल्लीस्थित अधिकाऱ्यांसोबत गेले अनेक वर्ष संपर्क साधून टेंडर मध्ये बदल करण्याची विनंती केली. त्यानुसारआता Budget CFS Terminal Ltd.या कंपनीने यशस्वी बोली लावल्यानंतर कंपनी व्यवस्थापणाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी संपर्क साधला.कामगार व कंत्राटदार यांच्याबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर दोघांनीही सी.डब्ल्यू. सी. कंपनी यशस्वी चालवण्यासाठी व डी.नोड ला पूर्वीचे दिवस आणून पुन्हा हजारो प्रकल्पग्रस्तांचा बुडालेला रोजगार मिळवून देऊन या सी.एफ.एस.मध्ये प्रकल्पग्रस्तांना  रोजगार मिळवून देणारे दिवंगत लोकनेते. दि. बा. पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी काम करणार असे ठरले. त्यानुसार कंपनी चालली पाहिजे,कंपनीतील काम सुरळीत चालले पाहिजे अश्या तत्वाने एक करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, कंपनी व्यवस्थापण व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments