काळ्या काचा लावणाऱ्या ७६ वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई....
काळ्या काचा लावणाऱ्या ७६ वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई....

पनवेल / वर्ताहर - : पनवेल वाहतूक शाखेकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर कारवाई ची मोहीम राबविण्यात आली. 
      २१ फेब्रुवारी  रोजी पनवेल वाहतूक शाखेकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ७६ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वाहन चालकामध्ये वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली असून यापुढे ही अशीच चालू राहील. यापुढे वाहन चालक यांनी  वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पनवेल वाहतूक विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल असे संजय नाळे, पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा यांनी सांगितले आहे. 
Comments