मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी कळंबोलीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन...


मंत्री उदय सामंत याच्या हस्ते उदघाटन...

पनवेल / वार्ताहर : - 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 
वाढदिवशी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२३ रोजी, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन समारंभ, कळंबोली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. अनेक कार्यकर्ते, नागरिक तसेच शुभेच्छुक या कार्यक्रमाला उपस्थित होते.  शुभेच्छा देण्यासाठी, मोठा जन समुदायाने  या कार्यक्रमास हजेरी लावली.
बाळासाहेबांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच मुख्य अतिथी म्हणून बाळासाहेबांचीं शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक मतदार संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या  उपस्थित शुभारंभाची फीत कापण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रामदास शेवाळे यांचे तोंड भरून कौतुक करून, सर्व बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन येणाऱ्या काळात पनवेल महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने काम करण्याचे आव्हान केले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रशांत ठाकूर (आमदार पनवेल मतदार संघ), यांच्या कार्याचे व युतीचे कार्य करण्यामध्ये जे योगदान दिल्याबाबत जाहीरपणे आभार व कौतुक केले.

Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image