उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचे पत्र...
पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचे पत्र...

पनवेल दि.१९ (वार्ताहर) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे पत्र देत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. 
उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या निवेदनपत्रामध्ये संपर्कप्रमुख बबन पाटील, मा आमदार मनोहर भोईर, सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, संतोष ठाकूर, संदीप तांडेल, रघुनाथ पाटील, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर संघटक डी एन मिश्रा, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, कुणाल कुरघोडे, बाळाराम मुंबईकर, कृष्णा भोईर, नितीन पाटील, हरेश्वर म्हात्रे, संतोष तळेकर, प्रशांत नरसाळे, ज्योती मोहिते, धनंजय पाटील, नीलिमा पाटील प्रदीप कदम, किरण सोनावणे, जमील खान, श्रद्धा कदम, निशा जाधव, सनी टेमघरे, श्याम खडकबान यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, हिंदू हृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड मेहनतीने रुजवलेल्या वाळवलेल्या शिवसेना या पक्ष, संघटना, विचार आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तोरोत्तर वाढतच चालला आहे. तरी केंद्रिय निवडणूक आयोग या ऐरवी स्वायत्त असणान्या परंतू २०१४ पासून केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या आयोगाने काल शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गद्दार गटाच्या प्रमुखाला आंदण दिले. हे महाराष्ट्रातील लोकशाहीवादी व विचारवंत जनतेला अजिबात मान्य नाही.
आम्ही मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता व असंख्य सेवाभावी संघटना संस्था आपणांस बिनशर्त, आजन्म जाहीर पाठिंबा, समर्थन असल्याचे पुन्हा एकदा जाहीर करत अधोरेखित करत आहोत. भविष्यात येवू घातलेल्या सर्व निवडणूकांमध्ये आपण शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवून हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबध्द असल्याचे आपल्याला वचन देत आहोत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फोटो : निवेदनपत्र
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image