शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱ्या नैना प्रकल्पा विरोधात आरपारच्या लढाईला प्रारंभ...
नैना प्रकल्पा विरोधात आरपारच्या लढाईला प्रारंभ...

पनवेल दि.०९(वार्ताहर): सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीच्या वतीने  पनवेल शहरातील शेकापच्या मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
           नवी मुंबई,पनवेल,उरण मधील २७० पेक्षा अधिक गावे विमानतळ बाधित म्हणून अधोरेखित केली गेली आहेत. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसविण्याच्या प्रयत्नात सिडको फुटकी कवडी देखील इन्वेस्ट न करता शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मलिदा लाटण्याचा प्रयत्न करत आहे. भूमी धारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळण्याकरता समितीने कंबर कसली असल्याचे मा आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. नैना प्रकल्प बाधित गावांच्यापैकी रोज एक गाव बंद करून सिडको प्रशासनाला खणखणीत इशारा देण्यात येणार आहे. आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, सिडकोच्या गल्ला भरून वृत्तीचे बाबत ग्रामस्थांना अवगत करणे हा आमचा मूळ हेतू आहे. आंदोलनाच्या बाबत माहिती देण्याकरता आमच्या गावोगावी बैठका सुरू झाल्या आहेत. कुणाचीही आबाळ होऊ नये या उद्देशाने सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी विक्री सुरू राहील. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार या दरम्यान गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून हा प्रकल्प कसा शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे याबाबत प्रबोधन केले जाईल. 
यावेळी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत, माजी नगराध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योजक जे म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, मा सभापती काशिनाथ पाटील, नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीचे वतीने ऍड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेव शेठ फडके, सुभाषशेठ भोपी, अनिल ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
१२ फेब्रुवारी  सुकापुर, १३ फेब्रुवारी  आदई, १४ फेब्रुवारी.  विहिघर, १५ फेब्रुवारी. विचुंबे, १६ फेब्रुवारी. पळस्पे, १७ फेब्रुवारी  चिपळे, १८ फेब्रुवारी  महाशिवरात्रीनिमित्त आंदोलन विश्रांती, १९ फेब्रुवारी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आंदोलन स्थगिती, २० फेब्रुवारी. बोनशेत - भोकरपाडा, २१ फेब्रुवारी. नेरे, २२ फेब्रुवारी देवद, २३ फेब्रुवारी हरीग्राम केवाळे, २४ फेब्रुवारी खानाव, २५ फेब्रुवारी रीटघर, २६ फेब्रुवारी शिरढोण, २७ फेब्रुवारी कोन, २८ फेब्रुवारी बोर्ले, १ मार्च. चिखले, २ मार्च कोळखे,पेठ,पारपुंड, ३ मार्च ऊसर्ली डेरवली, ४ मार्च शिवकर असे या साखळी आंदोलनाचे स्वरूप असणार आहे.



फोटो : पत्रकार परिषद
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image