अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीने पनवेलमध्ये भक्तिमय वातावरण...
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीने पनवेलमध्ये भक्तिमय वातावरण...

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल शहरात गावदेवी पाड्यावरील स्वामी समर्थ मठ - मंदिरात गेल्या वीस वर्षा पासून अक्कलकोट येथून स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होत असून या वर्षी सुद्धा समर्थांच्या पालखीचे पनवेल शहरात आगमन झाल्यावर पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी पालखी उचलून पालखी सोहळ्याला सुरवात झाल्यावर संपूर्ण शहरात पालखी परिक्रमा केल्यावर शहरातील वातावरण भक्तिमय झाले .
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. भारतासह  देश विदेशात स्वामी समर्थाना मानणारा मोठा वर्ग आहे . पनवेल येथील स्वामी समर्थ मठ हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे . स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती सुधाकर घरत यांच्या मार्गर्दर्शना खाली गेल्या वीस वर्षा पासून अक्कलकोट येथून येणाऱ्या स्वामी समर्थांच्या पालखीचे नियोजन करण्यात येते . संपूर्ण शहरात वारकऱ्यांच्या सोबतीला ढोल ताश्याच्या गजरात हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पालखी परिक्रमा करत असते . या वर्षी गावदेवी मंदिरा पासून सुरु झालेली पालखी परिक्रमा स्वामी हॉटेल ते जयभारत नाका ते सावरकर चौकापासून परत पालखी गावदेवी मंदिरापर्यंत नेण्यात आली . पालखीत उपस्थित असलेल्या महिला आणि पुरुषांनी पारंपारिख पोशाख घातल्याने पालखीला सांस्कृतिक रूप प्राप्त झाले होते . परिक्रमा सुरु असताना शहरातील विविध सामाजिक संघटनेकडून पालखीतील स्वामी भक्तांसाठी शीत पेय तसेच फराळ प्रत्येक नाक्यावर उपलब्ध करून दिला होता . संध्याकाळी निखालेली पालखी संध्याकाळी उशिरापर्यंत शहरातील विविध भागात असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण बघायला मिळत होती . संपूर्ण पनवेल शहरात पालखी परिक्रमा पूर्ण करून रात्री उशिरा मठात पालखीची सांगता करण्यात आली  .या वेळी पनवेल तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सामील झाले होते . मताधिपती सुधाकर घरत यांच्या कडून  पालखीत सामील झालेल्या वारकरींना शाल , श्रीफळ आणि तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले .   
Comments