रोडपाली येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात ; शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचे सहाय्य...
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचे सहाय्य...

पनवेल दि. २१ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त रोडपाली कळंबोली येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २० ते २७ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. शिवसह्याद्री प्रतिष्ठान व वारकरी सांप्रदाय रोडपाली यांच्या माध्यमातून रोडपाली सेक्टर १५ येथील शंभुराजे चौक मैदानात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तने आयोजित करण्यात आल्याने भाविकांना श्रवणसुखाची पर्वणी ठरणार आहे. यात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी पंडीत आचार्य मंगेश महाराज कदम, गुरुवार २३ फेब्रुवारी किर्तनकेसरी नंदकिशोर महाराज पवार क्षेत्र आळंदी देवाची, शुक्रवार २४ फेब्रुवारी वेदांताचार्य .पांडुरंग महाराज साळुंखे, शनिवार २५ फेब्रुवारी शिवचरीत्रकार अशोक महाराज पवार, रविवार २६ फेब्रुवारी समाज प्रबोधनकार संग्रामबापु महाराज भंडारे तर सोमवार २४ फेब्रुवारी रोजी बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे अशी माहिती श्रीकांत फाळके यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, गीतापाठ, प्रवचन, नित्यपाठ व हरिपाठ, कीर्तन त्यानंतर जागर असा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचे सहाय्य लाभले. नागरिकांनी या सप्ताहाचा लाभा घ्यावा, असे आवाहन आयोजक नारायण फडतरे व नितिन गुलदगड यांनी केले आहे.
फोटो : रोडपाली येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह
Comments