रस्त्यामध्ये तरुणांना अडवून लुटणाऱ्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक ..
रस्त्यामध्ये तरुणांना अडवून लुटणाऱ्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक ...


पनवेल / दि.१९ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का रोड वरून येत असताना तरुणांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना धमकावून त्यांच्याकडून सोन्याची बाली व मोबाईल काढून घेणाऱ्या तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.  
सदर घटनेतील फिर्यादी विशाल दतू कांबळे व त्याचा मित्र संदिप शर्मा हे पनवेल रेल्वे स्टेशन येथून चालत मालधक्का रोड वरून येत असताना त्यांना रस्त्यामध्ये तीन तरुणांनी अडवून त्यांना धमकावत 1 सोन्याची बाली व 2 मोबाईल काढून घेतली. याबाबत तरुणांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत,  नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोलीस नाईक विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोलीस शिपाई प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने आरोपी तकदिर साळुंखे (वय 19), राजू धोत्रे उर्फ भाऊ (वय १९), आणि रोहित चव्हाण उर्फ बाबा (वय 19) या तीन तरुणांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी 32 हजार 600 रुपये किमतीचे 1 ग्राम वजनाची सोन्याची बाली व 2 मोबाईल जप्त केले आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image