भिंगारी प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामन्यांचे मा नगरसेवक सुनील बहिरा यांच्या हस्ते उदघाटन..
 सुनील बहिरा यांच्या हस्ते उदघाटन...
 
पनवेल /प्रतिनिधी
भिंगारी ग्रामस्थ मंडळ आयोजित भिंगारी प्रीमिअर  लीगच्या दोन दिवसीय   क्रिकेट सामन्यांचे उदघाटन  मा नगरसेवक सुनील बहिरा यांच्या शुभहस्ते महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आले, यावेळी पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे, माजी सरपंच बाळकृष्ण परदेशी ,गजाजन परदेशी, रोहित शिवकर ,किरण मढवी, मयूर मढवी ,सुरज परदेशी ,रघुनाथ परदेशी यांच्यासह भिंगारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामन्यांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये आणि चषक मा नगरसेवक सुनील बहिरा यांनी प्रायोजित केले आहे .
 
पनवेल तालुकयातील बहुचर्चित अशा भिंगारी प्रीमिअर  लीगच्या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आखीव रेखीव आयोजन करण्यात आले असून  या दोन दिवसीय सामन्यांमध्ये  एकूण १० टीम खेळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे . खेळाडूंना प्राथमिक उपचार ,पाणी ,जेवण खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरिता कार्टून डान्स ,गाणी अशा जोशमय वातावरणात या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केल्याचे दिसून आले सुनील बहिरा यांनी क्रिकेट खेळाडूंसाठी विविध रंगात दिलेला गणवेश सगळयांना आकर्षित करीत होते, 
यावेळी राष्ट्रगीत घेऊन सामन्यांची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे मा नगरसेवक सुनील बहिरा यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले . यावेळी निलेश बहिरा ,सचिन कावळे यासह सुनील बहिरा क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .
Comments