रोटरी राहत मेडिकल मिशनसाठी डॉ. गिरीश गुणे यांना शुभेच्छा....
रोटरी राहत मेडिकल मिशनसाठी डॉ. गिरीश गुणे यांना शुभेच्छा....

पनवेल / प्रतिनिधी -  :  रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे संस्थापकीय सदस्य, पनवेल मधील लोकप्रिय डॉक्टर, रोटरी प्रांत 3131 चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे ओरिसा मध्ये भुवनेश्वरपासून पश्चिम बंगालच्या दिशेने 250 किमी दूर अश्या दुर्गम आदिवासी क्षेत्रात रोटरी प्रांत 3080, 3262 द्वारे आयोजित करण्यात आलेल्या
" रोटरी राहत "
बारीपाडा मेडिकल मिशन या 
ऑपरेटिव्ह (सर्जिकल कॅम्प) मिशनसाठी रवाना झाले त्यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या वतीने प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांचे उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या.

12 फेब्रु. ते 20 फेब्रु.2023 पर्यंत चालणाऱ्या या सर्जरी मिशन मध्ये डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या हजारो शस्त्रक्रिया करण्यात येणार असून इतर रोटरी प्रांत 3080, 3262, 3132, 3131, 3061, 3110, 3070 मधील रोटेरिअन्स डॉक्टर सहकार्य करणार आहेत या मध्ये प्रामुख्याने जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ. ई.एन.टी. सर्जन, प्लास्टिक सर्जन. ऍनेस्थेसियालॉजिस्ट  सहभागी होत आहेत.
वंचित आदिवासींसाठी बारीपाडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या विविध शस्त्रक्रिया केल्या जातील.
Comments