घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ...
घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ... 

पनवेल / दि.१९ (संजय कदम) : करंजाडे येथे घरातील दरवाज्याचे लॉक तोडून सोन्याचे बेसलेट व गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.  
करंजाडे येथील तथास्तु इमारतीत घराचे दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश करून 7 ग्राम वजनाचे सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र राऊत,  नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोलीस नाईक विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोलीस शिपाई प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यांचे ठिकाणी संशयित इसमांकडे चौकशी करून तसेच गुप्त बातमीदारांकडून आरोपींची माहिती काढली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शोएब कच्ची (वय 27) आणि विपुल रायकर (वय 28) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी चोरी केलेले 7 ग्राम वजनाची सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर असा एकूण 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image