नगरसेवक रवींद्र भगत यांच्या मागणीला यश; सिडकोच्या माध्यमातून डांबरीकरण कामाला सुरुवात...
     डांबरीकरण कामाला सुरुवात...

पनवेल / दि.०१ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या मागणीला यश आले असून  
पनवेल महानगरपालिका च्या माध्यमातून कळंबोली वसाहतीमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली
कळंबोली वसाहतीमधील बिकानेर स्वीट ते जाधववाडी पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी या कामासाठी सिडकोकडे पाठपुरावा केला. रवींद्र भगत यांच्या मागणीला यश आले असून अखेर सिडकोच्या माध्यमातून या रस्त्याच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. याबद्दल परिसरातील नागरिकांनी रवींद्र भगत यांचे आभार मानले आहे.
फोटो : बिकानेर स्वीट ते जाधववाडी पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
Comments