महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट...
 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट...

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - कोकण शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडी, टि.डी.फ, बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात येऊन शिवसेनेचे सर्व सहकारी आमच्या पाठीशी असल्याचे आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिक्षकसेनेचे अध्यक्ष ज.मो अभ्यंकरजी व शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील,शुभांगी पाटील हे उपस्थित होते..
Comments