उभ्या ट्रेलर ला मोटारसायकलची धडक ; एक जखमी ....
उभ्या ट्रेलर ला मोटारसायकलची धडक ; एक जखमी ....

पनवेल / दि.११ ( संजय कदम  ) : रस्त्यात उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला पाठीमागून मोटारसायकलीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील मौजे कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी - पनवेल मार्गावर घडली आहे . 
                       सदर मार्गावर एक ट्रेलर उभा ठेवण्यात आला होता तो ट्रेलर न दिसल्याने पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या उत्तम पांडे ( वय २३ ) याने सदर ट्रेलर ला पाठीमागून ठोकर मारून झालेल्या अपघातात तो स्वतः जखमी झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे .
Comments