हिंदू समाजातील काही नागरिकांच्या रितीनुसार दफन करण्यासाठी दफन भूमी देण्याबात मा.नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन ...
मा.नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन ...

पनवेल वैभव / दि.१६(संजय कदम): पनवेल महापालिकेच्या खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल याप्रमाणे चार विभाग/प्रभाग असून सदर प्रभागांमध्ये देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पंथाचे हिंदू लोक राहत आहेत. यामधील काही हिंदू समाजातील नागरिकांच्या रितीनुसार मृत्युनंतर दफन करण्यासाठी वेगळे अथवा अस्तित्वात असलेल्या स्मशान भूमीचे क्षेत्र वाढवून अथवा वेगळी दफनभुमी देण्याबाबत पनवेल महापालीकेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी महापालीकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. 
              पनवेल महापालिकेच्या खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल याप्रमाणे चार विभाग/प्रभाग असून सदर प्रभागांमध्ये देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पंथाचे हिंदू लोक राहत आहेत. व भविष्यात नैना (सिडको) व आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये सुध्दा असे लोक रहावयास येतील. वास्तविकपणे वरील चारही प्रभागात वेगवेगळया हिंदू स्मशानभूमी आहेत. बरेच लोक हिंदू धर्माप्रमाणे मृत्युनंतर दहन करतात तर हिंदू धर्मातील काही पंथ उदा. जंगम, गोसावी, लिंगायत, नाथपंथीय व इतर काही तसेच 5 वर्षाखालील लहान मुले यांचे रितीरिवाजाप्रमाणे मृत्युनंतर दफन करण्याची प्रथा आहे. परंतु, सिडकोने ज्या पारंपारिक स्मशान भूमी आहेत त्यावरच स्मशान भूमी विकसित केल्यात व त्या केवळ दहनासाठी योग्य ठरतात, परंतु वर म्हटल्याप्रमाणे जंगम, गोसावी, लिंगायत, नाथपंथीय व इतर पंथ तसेच लहान मुलांचे निधनानंतर त्यांना दफन करण्यासाठी सदर चारही विभागातील स्मशान भुमीचे क्षेत्र वाढविणे किंवा नव्याने दफनभूमी विकसित करणे गरजेचे आहे. काही वेळेस निधनानंतर केवळ मोठया माणसांचे प्रेत दफन करण्यासाठी जागा अपुरी असल्याने लोकांना त्यांचे नातेवाईकांचे प्रेत गावाकडे घेवून जावे लागते. त्यामुळे ऍम्ब्युलन्स खर्च व मनस्तापाला सामोरे जावे लागते. तरी वरील समस्येचा विचार करुन महापालिकेच्या चारही प्रभाग / विभागातील काही स्मशानभुमीत वरील समाजाचे लोकांच्या भावनेचा विचार करुन त्यांच्या चालीरितीचा आदर करुन आवश्यक असे स्मशान भूमिचे क्षेत्र वाढवून अथवा नविन हिंदू दफन भुमी तयार करुन लोकांच्या जनभावनेचा आदर करावा व त्याप्रमाणे योग्य ती तजविज करावी अशी विनंती या निवेदतुन करण्यात आली आहे. तसेच या निवेदनाची प्रत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही देण्यात आली आहे. 
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image