शेकडो युवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश...
शेकडो युवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश...
पनवेल दि.२७ (वार्ताहर) : पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील शेकडो युवकांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाची शाल देऊन या तरुणांचे मान्यवरांनी पक्षात स्वागत केले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले. 

खारघर येथील बाळासाहेबांची शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील नेतृत्वाखाली पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे व खारघर शहर तसेच ग्रामीण भागातील तरुण, महिला व युवतींनी उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, रुपेश पाटील, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेने उत्तर रायगड युवासेनेच्या माध्यमातुन लवकरच पनवेल येथे रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे असे राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांनी सांगितले.

फोटो : शेकडो युवकांनी केला बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
Comments