मंगेश परुळेकर यांचे अभिनंदन...
पनवेल / दि.१०(संजय कदम) : देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या आयएनएस विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या जहाजाची प्रतिकृती मंत्रालयात ठेवण्याचा निर्णय ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांनी घेतला. याबद्दल अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती निलेश पाटील आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा अधिराज सामाजिक विकास मंडळाचे सचिव निलेश पाटील यांनी ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या आयएनएस विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. संस्कार भारती आणि ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांच्या संकल्पनेतून हि प्रतिकृती ओरायन मॉल मध्ये ठेवण्यात आली होती. पनवेलमध्ये सुरू केलेल्या उपक्रमाची दखल राज्याच्या सांस्कृतिक विभागाने घेवून विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. ही संपुर्णपणे भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत आपल्या भारतासाठी अभिमान आहे, भारताच्या वैभवात भर टाकणारी प्रशस्त महाकाय युध्दनौका प्रत्यक्षात प्रत्येकालाच पहायला मिळेल की नाही याची शास्वती नव्हती, परंतू मंगेश परुळेकर यांच्यामुळे ही प्रतिकृती सर्वांना पहायला मिळाली. याबद्दल अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रचिती निलेश पाटील आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा अधिराज सामाजिक विकास मंडळाचे सचिव निलेश पाटील, यांनी ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक राकेश पोटे आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : मंगेश परुळेकर यांचा सत्कार