साई नारायण बाबा यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबीराचे आयोजन...
मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबीराचे आयोजन...

पनवेल दि.३१ (संजय कदम) : परमपूज्य श्री साई नारायण बाबा यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबिराचे रविवार १२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.  
पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील श्री साई नारायण बाबा आश्रम येथे रविवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते २ दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नेत्ररोग शल्यचिकित्सकांकडून पूर्ण डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी, मोफत दंत तपासणी, ईसीजी, रक्तातील साखर, बीएमडी चाचणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरात चष्म्याचे देखील मोफत वाटप करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी यांनी केले आहे. 
फोटो : साई नारायण बाबा यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबीर
Comments